News Tuesday, June 2, 2020 - 21:46
Submitted by maharastra on Tue, 2020-06-02 21:46
Select District:
News Items:
Description:
निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने (Cyclone Nisarga live update) वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहेत. पालघर, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल (Hurricane prediction by IMD in Kokan region). याचा मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसण्याचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊसही होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर हे वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे